Ravikant Tupkar's agitation: शेतकऱ्यांचा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 'अन्नत्याग' आंदोलन शासनावर वाढला आहे. मेरा खुर्दमध्ये जिल्ह्यातील एकत्रित शेतकरी आंदोलनासाठी रस्ता बंद करण्याच्या प्रयत्ना
चिखली (Ravikant Tupkar's agitation) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पीक विमा, संपूर्ण कर्जमुक्ती आणि इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.
रविकांत तुपकर (Ravikant Tupkar's agitation) यांनी शेतकरी प्रश्नांवर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यासह राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असून विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मेरा खुर्द येथे शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, "आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येत्या काळात बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरू आणि आंदोलन अधिक तीव्र करू." रास्ता रोको आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये विनायक सरनाईक, गणेश थुट्टे, सुनील मिसाळ, भागवत थुट्टे, भानुदास घुबे, विशाल थुट्टे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या (Ravikant Tupkar's agitation) आंदोलनाला राज्यातील विविध भागांतून पाठिंबा वाढत असून शेतकरी संघटनांकडून रास्ता रोको, निदर्शने आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.