Nanded-Tanakpur Express: दक्षिण मध्य रेल्वेने हिंगोली ते टनकपूर दरम्यान ‘हजूर साहिब नांदेड-टनकपूर’ साप्ताहिक एक्सप्रेस 17631/17632 क्रमांकासाठी सुरू करून देण्याचा निर्णय घेतला.
हिंगोली (Nanded-Tanakpur Express) : प्रवाशांना अधिक सुलभ, आरामदायी आणि थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने गाडी क्रमांक 17631/17632 हजूर साहिब नांदेड – टनकपूर – हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नियमित स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 17631 हजूर साहिब नांदेड – टनकपूर साप्ताहिक एक्सप्रेस (Nanded-Tanakpur Express) 12 जुलै पासून नियमित धावणार आहे. ही गाडी दर रविवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी हजूर साहिब नांदेड येथून सुटेल. प्रवासात पूर्णा येथे रात्री 12 वाजून 50 मिनिटांनी, वसमत येथे 1 वाजून 30 मिनिटांनी, हिंगोली येथे 2 वाजून 35 मिनिटांनी, वाशीम येथे 3 वाजून 55 मिनिटांनी आणि अकोला जंक्शन येथे सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी थांबून पुढे टनकपूरकडे रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी टनकपूर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 17632 टनकपूर – हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस 14 जुलै पासून नियमित धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी सकाळी 9 वाजता टनकपूर येथून सुटेल. प्रवासात अकोला जंक्शन येथे 10 वाजून 55 मिनिटांनी, वाशीम येथे 12 वाजून 20 मिनिटांनी, हिंगोली येथे 1 वाजून 5 मिनिटांनी, वसमत येथे 1 वाजून 45 मिनिटांनी आणि पूर्णा येथे 2 वाजून 50 मिनिटांनी थांबेल. ही गाडी बुधवारी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
ही (Nanded-Tanakpur Express) साप्ताहिक एक्सप्रेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या चार राज्यांतील महत्त्वाच्या शहरांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणार आहे. मार्गात ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला जंक्शन, मलकापूर, खंडवा जंक्शन, इटारसी, राणी कमलापती, बीना, ललितपूर जंक्शन, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर जंक्शन, धौलपूर, आग्रा कॅन्ट, मथुरा जंक्शन, कासगंज, बदायूं, बरेली जंक्शन, इज्जतनगर, पिलीभीत आणि खटीमा या स्थानकांवर थांबेल.
या (Nanded-Tanakpur Express) गाडीमध्ये एसी द्वितीय श्रेणी, एसी तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणी डबे उपलब्ध असतील. ही सेवा यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांनी आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे आरक्षण केंद्रे किंवा ऑनलाइन आरक्षण सुविधेचा वापर करून आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालय, नांदेड तर्फे करण्यात आले आहे.