Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे राबवा; नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: विशेष सखोल पुनरिक्षण अभियाने (एसआयआर) प्रभावीपणे राबवून नागरिकांना एकहीच मतदारी यादीत सहाय्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे राबवा नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta |

 

जिल्हाधिकाऱ्यांकडून 'एसआयआर'चा आढावा

वसमत/ कळमनुरी (Collector Rahul Gupta) : विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियान (एसआयआर) प्रभावीपणे राबवून पात्र एकही मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज वसमत, कळमनुरी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी आज वसमत व कळमनुरी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रथम वसमत नगर परिषद कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच मतदार नोंदणी व पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

यानंतर त्यांनी गणपती मंदिर परिसरात सुरू असलेल्या एसआयआर मतदार यादी पडताळणी केंद्राला भेट देऊन मतदार याद्यांची पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व इतर प्रक्रियेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी महात्मा गांधी विद्यालय येथे सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानाच्या कामकाजाची पाहणी केली. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया, अर्ज स्वीकृती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. अभियानात पारदर्शकता, अचूकता आणि वेळेचे नियोजन राखून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

त्यानंतर कळमनुरी तहसील कार्यालय आणि इंदिरानगर येथे विशेष‌ संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानाच्या कामकाजाची पाहणी केली. येथेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थितांना यादी अद्ययावत करताना एकही मतदार मतदार यादीत नाव नोंदणी करण्यापासून  राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, श्रीमती प्रतीक्षा भुते, तहसीलदार सारंग चव्हाण, जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी रविकांत दरक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

वसमत शासकीय स्त्री रुग्णालयास भेट

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालयालाही भेट देऊन रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, उपचार व्यवस्था, औषधांचा साठा तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. रुग्णांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.