Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

ऑटो-पिकअप अपघात

परभणीतील झरी येथे ऑटो-पिकअपचा अपघात

Auto-Pickup accident: ऑटो आणि पिकअपचे दोन वाहने एकाच दिशेनेच जाऊन भयानक अपघात झाला. सहा जणांचा गंभीर जखमा होत असून त्यांच्या उपचारातून एक मृत्यू निघाला.


परभणीतील झरी येथे ऑटो-पिकअपचा अपघात 

Auto-Pickup accident |

 

 उपचारादरम्यान एकाचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी ...!

परभणी (Auto-Pickup accident) : झरी येथे गुरुवार २५ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान ऑटो आणि छोटा हत्ती पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झरी येथून परभणीकडे जाणारा ऑटो आणि मेंढ्या-शेळ्या घेऊन परभणीकडे जाणारा छोटा हत्ती पिकअप (क्रमांक एम.एच ०५ ईएल ७४९३) हे दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोर अचानक काहीतरी आल्याने पिकअप चालकाने जोरात ब्रेक लावले. त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या ऑटोने पिकअपला जोरदार धडक दिली.

या अपघातात झरी येथील किरण देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ऑटोमधील इतर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहीका चालक दिनेश बिरगड यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना त्वरित परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.