Parbhani Accidental Death: ताडबोरगाव शिवारातील देऊळगाव अवचार पाटीत राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या अपघातामुळे मोटरसायकल चालक विलास कोंडीबा टेकाळे यांचा जागी मृत्यू झाला
दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; देऊळगाव अवचार पाटीजवळील घटना
मानवत /ताडबोरगाव (Parbhani Accidental Death) : मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारातील देऊळगाव अवचार पाटीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर शनिवार २० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक विलास कोंडीबा टेकाळे (वय ४२, रा. देवनांद्रा, ता. पाथरी) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास टेकाळे हे मोटरसायकल क्र. एमएच-२२ एबी ९२०० वरून पाथरीहून ताडबोरगावकडे जात असताना समोरून येणार्या कारने क्र. एमएच-०१ बीजी ०५६४ त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या (Parbhani Accidental Death) अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर त्यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस निरीक्षक सुदर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अतुल पंचांगे, रहीम सय्यद व दत्ता माने यांच्या उपस्थितीत रविवार २१ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर (Parbhani Accidental Death) मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे देवनांद्रा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.