Breaking News
  • कंगनाचा पुन्हा निशाणा; अभिजीत दिपकेंच्या इंग्रजीवर अप्रत्यक्ष टोला
  • फडणवीसांच्या दिल्लीवारीला नवा अर्थ? भाजपच्या संसदीय मंडळात मिळणार मोठी जबाबदारी?
  • पावसाचा जोर वाढणार! राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
  • सोन्याच्या दरात घसरण; २४ कॅरेट सोनं ₹२२० प्रति ग्रॅम स्वस्त, चांदीचे भाव स्थिर
  • राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष
  • Pune: पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66 वे वार्षिक अधिवेशन
  • Pune: पुण्यात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक
  • Amravati: जिल्हा रुग्णालयात ३ बाळांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
  • मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धंजली

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Manora Panchayat Samiti

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण करून जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी मानोरा पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात घडली.


ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

Manora Panchayat Samiti |

मानोरा पंचायत समिती कार्यालयातील घटना; सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा

मानोरा : ग्रामसभा झाल्याचे ठरावाचे अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी आलेल्या ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण करून जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी मानोरा पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात घडली. या प्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गादेगाव येथील ग्रामरोजगार सेवक ग्रामसभा झाल्याचे ठरावाचे अहवाल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासोबत पंचायत समिती मानोरा येथे सादर करण्यासाठी आले होते. संबंधित कागदपत्रे जोडण्याचे काम सुरू असताना गादेगाव येथील सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण हे दोघे तेथे आले.

यावेळी दोन्ही आरोपींनी ग्रामरोजगार सेवकाला चपलीने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जातीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही घटना पंचायत समिती कार्यालयात घडत असताना तेथे उपस्थित असलेल्या अनेक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी ती पाहिल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर फिर्यादीने मानोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मारहाणीच्या वेळी उपस्थित असलेल्या काही नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी मानोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सुदाम भिका जाधव आणि पुष्पा महादेव चव्हाण यांच्याविरुद्ध BNS 2023 मधील कलम 115 (2), 351 (2), 296, 3 (5) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील कलम 3 (1) आर, 3 (1) यस आणि 3 (2) व्ही अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

Related to this topic: