Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

मालवाडा घाट मृतदेह

मालवाडा घाटात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Malvada Ghat Dead Body: मालवाडा घाट परिसरात पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केलेल्या अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत आढळून आला.


मालवाडा घाटात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Malvada Ghat Dead Body |

माहुर (Malvada Ghat Dead Body) : राष्ट्रीय महामार्ग १६१-अ लगत असलेल्या मालवाडा घाट परिसरात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मालवाडा गावाकडे जाणाऱ्या पायवाटेजवळील सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दरीत दगडांच्या रचलेल्या पोऊळीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Malvada Ghat Dead Body) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके, बिट जमादार सत्यपाल मडावी व इतर पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता, पांढरा शर्ट व काळी पँट परिधान केलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असावा. मृतदेह कुजल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती तर दरी खोल व परिस्थिती कठीण त्या ठिकाणी कोणतेही वहाण जात नसल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके यांनी स्वतः पुढाकार घेत होमगार्ड भगत व इतर दोन व्यक्तींच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढीत नगरपंचायतीच्या स्वर्गरथातून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर (Malvada Ghat Dead Body) मृत व्यक्तीची ओळख वृत्त लिह पर्यंत पटलेली नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related to this topic: