Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Malkapur Police

मलकापूर शहरात पोलिसांची धडक कारवाई; जुलै महिन्यात ५४७ केसेस, सव्वादोन लाखांहून अधिक दंड वसूल

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने मलकापूर पोलीस स्टेशनने जुलै महिन्यात व्यापक विशेष मोहीम राबविली.


मलकापूर शहरात पोलिसांची धडक कारवाई जुलै महिन्यात ५४७ केसेस सव्वादोन लाखांहून अधिक दंड वसूल

Malkapur Police |

जुगार, दारूबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, राँग साईड आणि वाहतूक नियमभंगाविरोधात व्यापक मोहीम; पोलिसांचा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर बडगा

मलकापूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक शिस्तीची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने मलकापूर पोलीस स्टेशनने जुलै महिन्यात व्यापक विशेष मोहीम राबविली. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जुगार, दारूबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, राँग साईड तसेच विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली. या कारवाईतून २ लाख ४४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक शिस्त आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे शहरात सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

जुलै महिन्यातील कारवाईमध्ये जुगाराच्या १०, दारूबंदी कायद्यांतर्गत १०, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ७ तसेच राँग साईड वाहन चालविण्याच्या ५० प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय वाहन परवाना, हेल्मेट, आवश्यक कागदपत्रे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या सर्व कारवायांमधून एकूण ५४७ प्रकरणे नोंदवून २ लाख ४४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष तपासणी नाके उभारण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. अवैध जुगार आणि दारूविक्रीविरोधातही पोलिसांनी प्रभावी मोहीम राबविल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते.

पुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच कायद्याचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन मलकापूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात सुरक्षित, शिस्तबद्ध आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: