Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; १० व ११ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली.


मलकापूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर १० व ११ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन

Malkapur Gram Panchayat Elections 2026 |

मलकापूर (Malkapur Gram Panchayat Elections 2026) : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मलकापूर तालुक्यातील एकूण ३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय सदस्य आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील सुधारित तरतुदींनुसार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण निश्चित केले जाणार असून, प्रत्येक प्रवर्गातील महिला आरक्षणाचाही समावेश असणार आहे. या प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन टप्प्यांत आरक्षण सोडत

१० जून २०२६ (बुधवार) – १८ ग्रामपंचायती
मलकापूर ग्रामीण, घिर्णी, निंबारी, दाताळा, तालसवाडा, कुंड बु., दुधलगाव खुर्द, वरखेड, दसरखेड, म्हैसवाडी, तिघ्रा, भालेगाव, लासुरा, शिराढोण, हरणखेड, वाघुड, दुधलगाव बु. आणि भानगुरा.

११ जून २०२६ (गुरुवार) – १६ ग्रामपंचायती
खामखेड, माकनेर, धरणगाव, वडजी, नरवेल, तांदुळवाडी, जांभुळधाबा, वडोदा, विवरा, वाघोळा, चिखली (रणथम), भाडगणी, हिंगणाकाझी, पिंपळखुटा बु., लोणवडी आणि कुंड खुर्द.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार असून, ग्रामपंचायतींच्या भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे संबंधित गावांतील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे.

Related to this topic: