Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मलकापुर पाणी टंचाई

पाणी मागणीसाठी गेलेल्या म्हाडा काॅलनीतील महिलांना ऑफीसमध्ये तक्रारी घेवून या..असा अजबच सल्ला!

Malkapur water shortage: मलकापूरात १७ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद असल्याने महिलांची आंदोलन सुरू झाली. नगराध्यक्षांनी जनतेला दमदाटी देण्याची नोंद सोशल मीडियावर व्हायरल झाली.


पाणी मागणीसाठी गेलेल्या म्हाडा काॅलनीतील महिलांना ऑफीसमध्ये तक्रारी घेवून याअसा अजबच सल्ला

Malkapur water shortage |

 

मलकापुरात 17 व्या दिवशी नळाला पाणी नाही...
प्रशासन सुस्त, जनता त्रस्त! मलकापुरात पाण्यासाठी हाहाःकार; संतप्त महिलांचा नगराध्यक्षांच्या दारात 'एल्गार'!

​मलकापुर (Malkapur water shortage) : शहरात सध्या विकासाच्या बाता मारणाऱ्या लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी भागात गेल्या १७ दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. ही लोकशाही आहे की जनतेच्या संयमाची क्रूर थट्टा? पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या जनतेच्या सहनशीलतेचा शेवटी काल रात्री अंत झाला आणि (Malkapur water shortage) मलकापुरात एका मोठ्या जनक्षोभाचा भडका उडाला.

आधी पाण्याचा टिपूस द्या, मगच घरात जा!

काल रात्री म्हाडा कॉलनीतील शेकडो तहानलेले नागरिक – ज्यात कडेवर लहान मुले घेतलेल्या महिला, आबालवृद्ध आणि पुरुषांचा समावेश होता – थेट नगराध्यक्ष आतीक ज्वारीवाले यांच्या निवासस्थानावर धडकले. "आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे," अशा घोषणा देत संतप्त महिलांनी चक्क नगराध्यक्षांच्या घरासमोरच 'ठिय्या आंदोलन' सुरू केले.
​रात्रीच्या अंधारात घरात एसीच्या हवेत सुखाने झोपणाऱ्या लोकप्रतिनिधींना घराबाहेर तहानलेल्या जनतेचा आक्रोश ऐकवण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

याची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत:

- ​१७ दिवस पाणी का नाही? मलकापूर नगरपरिषदेचा कारभार नक्की रामभरोसे चालला आहे की येथील अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत?
- कर गोळा करताना तत्परता, मग सुविधेच्या वेळी पळपुटेपणा का?
- जनतेकडून पाण्याचे टॅक्स वसूल करायला पालिका पुढे असते, मग १७ दिवस पाणी पुरवठा बंद असताना प्रशासन काय ढाराढूर झोपले होते का?
- निवडणुकीपुरतेच पाय धरणार का?
- मतांचा जोगवा मागताना गल्लोगल्ली फिरणारे नगराध्यक्ष आज म्हाडा कॉलनीतील माता-भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या असताना कुठल्या बिळात लपून बसले आहेत?
- ​नगराध्यक्ष महोदय, तोडगा कधी निघणार... की फक्त हम वादे  नहीं इरादे लेकर आये है म्हणत राहणार आश्वासनांची नगराध्यक्ष महोदय, तोडगा कधी निघणार... की फक्त आश्वासनांची गाजरे?

काल रात्री झालेल्या या (Malkapur water shortage) उग्र आंदोलनाने मलकापूर नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. आंदोलक महिलांचा पारा एवढा चढला होता की, 'जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही' अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

आता जाहीर सवाल:
नगराध्यक्ष महोदय, या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार लोकनियुक्त नगराध्यक्ष एक जवारी वाले हे कार्यालयात हजर राहत नसून नागरिकांनी पाहण्यासाठी वेळोवेळी कार्यालयाचे दरवाजे ठोकले काल नगराध्यक्ष घरी असल्याची माहिती मिळाल्याने संतप्त महारा वासियांनी नगराध्यक्षांचे घर गाठले मात्र यावेळेस जनतेचे सांत्वन न करता तक्रारी घेऊन ऑफिसमध्ये या घरी येऊ नका असे म्हणून त्यांनी मतदारांना दमदाटी केल्याची व्हिडिओ क्लिप (Malkapur water shortage) सोशल मीडिया द्वारे  व्हायरल होत आहे जनतेने मत दिले तर तुम्हाला पाणी द्यावेच लागेल की प्रत्येक घागरीसाठी नगराध्याच्या दारात असेच कटोरे घेऊन उभे राहावे लागणार? जनतेचा हा संतप्त सवाल आहे, याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल!

Related to this topic: