Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

त्या महेश बिडगर याच्या समर्थनार्थ असलेल्या मोर्चाला परभणीत विरोधकांनी राजकीय वळण दिले: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

MLA Dr. Ratnakar Gutte: महेश बिडगरच्या मार्हाण प्रकरणावरून निषेध माहिती जावयासारख्या आंतरिक दबावामुळे धनगर समाजाचे समर्थकांनी गंगाखेडात सामूहिक विरोध प्रकट केला.


त्या महेश बिडगर याच्या समर्थनार्थ असलेल्या मोर्चाला परभणीत विरोधकांनी राजकीय वळण दिले आ डॉ रत्नाकर गुट्टे

MLA Dr. Ratnakar Gutte |

परभणी (MLA Dr. Ratnakar Gutte) : गंगाखेड येथील महेश बिडगर मारहाण प्रकरणी धनगर समाज बांधवांच्या वतीने महेश बिडगर यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला विरोधकांनी राजकीय वळण दिल्याचा आरोप करत विरोधकांच्या आरोपात तथ्य असेल तर मी राजीनामा देतो असे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सोमवार १३ जुलै रोजी राम सीता सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

गंगाखेड तालुक्यातील धनगर समाजातील युवक महेश बिडगर मारहाण प्रकरणावरून तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केल्या जात होता. या मारहाण प्रकरणानंतर महेश बिडगर यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संपूर्ण धनगर समाजातून रोष व्यक्त केल्या जात होता. यामध्ये स्थानिक आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निकटवर्तीयांचे हात असल्याचा आरोप महेश बिडगर यांनी काही युट्युब न्युज चॅनलशी बोलतांना केल्यामुळे शनिवार ११ जुलै रोजी महेश बिडगर यांच्या समर्थनार्थ गंगाखेड शहरात धनगर समाज बांधवांचा विराट मोर्चा निघाला होता. या मोर्चात धनगर समाज बांधवांसह अन्य समाजातील समाज बांधव तसेच विविध राजकीय पक्षाचे पुढारी ही सहभागी झाले होते.

मोर्चात सहभागी पुढार्‍यांनी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर आरोप केल्यामुळे आज आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन करत महेश बिडगर याला झालेल्या मारहाणीचा निषेध करून पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करत दोषीविरुद्ध कार्यवाही करून महेश बिडगर यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासंबंधी पोलीस प्रशासनाला बोलल्याचे त्यांनी म्हटले पुढे बोलतांना आ. डॉ. गुट्टे म्हणाले की शनिवार रोजी गंगाखेड शहरात महेश बिडगरच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला विरोधकांनी राजकीय वळण देत याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे व आरोप करतांना पुराव्यानिशी आरोप करावे मारहाणीच्या घटनेशी माझा काही संबंध नाही असे सांगत यात तथ्य असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देतो असेही आ.डॉ. गुट्टे यांनी म्हटले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, संदीप अळनुरे, सुशांत चौधरी, कृष्णा दळणर, पंचायत समिती सभापती मनोज मुंडे, रमेश खांडेकर, प्रताप मुंडे, उद्धव शिंदे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भुमरेंकडून चुकीची दिशाभूल: आ. डॉ. गुट्टे 

गंगाखेडच्या मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी आमदाराकडून नारायणराव पिसाळ यांच्यावर सहा कोटीचा बोजा टाकण्याचे कटकारस्थान झाल्याचा आरोप केला. मुळात हा आरोप अत्यंत चुकीचा असून २०१६ सालीच पिसाळ यांच्यावर सहा कोटींचा बोजा पडलेला आहे. तत्कालीन कालावधीत मी आमदार नव्हतोच व माझा याच्याशी काही संबंधही नाही. त्या पुढे जाऊन २०१९ ला नारायणराव पिसाळ यांचे वडील दिवंगत मारोतराव पिसाळ यांनी माझे विधानसभेला काम केले आहे असे असतानाही वास्तविकता बाजूला ठेवून भुमरे हे लोकांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असून ही दिशाभूल थांबवावी असा इशारा आ. डॉ. गुट्टे यांनी सुरेश भुमरे यांना दिला आहे.

Related to this topic: