Lord Mahavir Jayanti: कळमनुरी शहरात जैन समाजाने महावीर जयंती उत्सवाचे आयोजन केले, ज्यात शोभायात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.
कळमनुरी (Lord Mahavir Jayanti) : कळमनुरी शहरात सकल जैन समाजाच्या वतीने दि. ३१ मार्च रोजी भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव (महावीर जयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त (Lord Mahavir Jayanti) शहरातून ढोल ताशाच्या गजरात मोठी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी जैन समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कळमनुरी येथील सकल जैन समाजा तर्फे शहरात महावीर जयंती निमित्त दि. ३१ मार्च रोजी भव्य शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती (Lord Mahavir Jayanti) शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. महावीर जन्मकल्याणक समिती व सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेच्या दरम्यान शहरात ठीक ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या वेळी विनोद राके, राजेंद्र मांडवगडे, दिलीप मांडवगडे, अनिल राके,सुधीर मांडवगडे,किरण राके, जितेंद्र साकळे,संतोष साकळे, विशाल साकळे, सागर साकळे,रुपेश मांडवगडे, कुणाल मांडवगडे,रुपेश सोनी,प्रेम साकळे, प्रतीक साकळे,श्रीकांत मांडवगडे, पारस मांडवगडे,आकाश साकळे,श्रेणीक राके,अंकेत जैन,अंकित साकळे,रजत मांडवगडे, निशांत मांडवगडे,अंकेत जैन,शुभम जैन,सावन मांडवगडे,सुबोध साकळे, प्रशांत साकळे,आश्विन मांडवगडे, शेखर डहाळे,सौरभ साकळे,यांच्यासह सकल जैन समाज बांधवांची व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान ही शोभायात्रा संपन्न झाल्यावर शहरातील तिन्ही जैन मंदिरात अभिषेक,पुजा,पाळणा आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम विधिवत व शांततेत पार पडले.तसेच महावीर जयंती (Lord Mahavir Jayanti) सायंकाळी पाठ शाळेतील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
आमदार संतोष बांगर माजी आमदार गजाननराव घुगे यांची उपस्थिती
महावीर जयंतनिमित्त (Lord Mahavir Jayanti) कळमनुरीविधानसभेचे आमदार संतोष बांगर माजी आमदार गजाननराव घुगे,भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कावडे,अशोक संगेकर, अमिष दरक,गोविंद मणियार,राहुल मेने, इंदेश काबरा आदींनी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जैन बांधवांना महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने थंडपेय वाटप
भगवान महावीर स्वामी जयंती (Lord Mahavir Jayanti) निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने तोटलिंग स्वामी मठ संस्थान जवळ थंडपेय वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष शिवराज चौधरी पाटील, नगराध्यक्ष प्रतिनिधी वैभव पाटील उर्फ आर आर पाटील, नगरसेवक बबलू पत्की, गटनेते रवी शिंदे, नगरसेविका प्रणिता बुर्से, राजु पटने,अनिल बुर्से, अतुल बुर्से, कुलभूषण बुर्से,पिंटू गडदे, बबलु पंचलिंगे,ओमकार व्यवहारे, ओंकार थळपते, बंटी चवात,महेश धाडवे,योगेश आलदुर्गे,मनदीप दहिवाळ,ओम गिरगावकर आदींची उपस्थिती होती.