Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

महसूल कर्मचारी निवास

कोट्यवधींच्या महसूल कर्मचारी निवासस्थाने ठरली ‘शोभेची वस्तू’

Revenue Staff Awas: गडचिरोलीतील महसूल विभागाच्या इमारतींची देखभाल न झाल्याने त्या बेवारस अवस्थेत आहेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे.


कोट्यवधींच्या महसूल कर्मचारी निवासस्थाने ठरली ‘शोभेची वस्तू’

Revenue Staff Awas |

प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; 10–12 वर्षांपासून इमारती बेवारस अवस्थेत

हेमंत उपाध्ये

गडचिरोली (Revenue Staff Awas ) : घोट परिसरात महसूल विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली तलाठी व मंडळ अधिकारी कर्मचारी निवासस्थाने आजही वापराअभावी ओस पडलेली आहेत. 2011 साली तत्कालीन गृहमंत्री तथा पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा इमारतींना मंजुरी देण्यात आली होती. घोट येथे उभारण्यात आलेल्या या इमारतींचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी रंगरंगोटी, इलेक्ट्रिक फिटिंग, दरवाजे-खिडक्या आदी कामे अपूर्ण राहिल्याने त्या आजपर्यंत वापरात आलेल्या नाहीत. परिणामी, गेल्या जवळपास 10 ते 15 वर्षांपासून या वास्तू बेवारस अवस्थेत पडून असून अक्षरशः “शोभेची वस्तू” बनल्या आहेत.

चामोर्शी तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मोठा निधी खर्च करून या इमारती उभारल्या. मात्र, संबंधित विभागाकडून बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले नसल्याने आणि अधिकृत हस्तांतरण न झाल्याने त्या वापरातच आलेल्या नाहीत. देखभालीअभावी (Revenue Staff Awas) इमारतींची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परिसरात झुडपे वाढून संपूर्ण जागा ओसाड व निर्जन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी इमारतींना जीर्णतेची चिन्हेही स्पष्टपणे दिसत आहेत.

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “जनतेच्या पैशांचा हा सरळ अपव्यय आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उर्वरित कामे पूर्ण करून इमारतींचा त्वरित वापर सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

2 इमारतीमध्ये 16 निवासस्थाने असलेल्या महसुल विभागाच्या कर्मचारी (Revenue Staff Awas) व इतर कर्मचाऱ्यांसाठी चांगला उपयोग झाला असता. मात्र महसूल विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने करोडोरुपये खर्च केलेल्या जनमाणसाचा पैशाचा अपव्य नाही का ? असा सवाल जनसामान्य उपस्थित करीत आहे.

Related to this topic: