Mayor Syed Iqbal: महानगरपालिकेतील महापौर सय्यद इकबाल यांचा दालनात गुरुवारला गुन्हा करून आरोपी अटक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाकटा भासण्यासाठी काम बंद आंदोलन
शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Mayor Syed Iqbal) : शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या दालनात गुरुवार ९ जुलै रोजी हल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका आरोपीवर नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. या घटनेच्या निषेर्धात शुक्रवार १० जुलै रोजी अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, कचरा डम्पिंग संदर्भातील अर्जावर कारवाई न झाल्याच्या कारणावरुन संशयीताने महापौरांच्या दालनात गोंधळ घालत परवानगी शिवाय मोबाईल वर चित्रीकरण सुरु केले. तसेच महापौरांच्या अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हस्तक्षेप करणारे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांना धक्का बुक्की करुन त्यांचा चश्मा फोडून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महानगरपालिकेतील कर्मचार्यांनी, सुरक्षा रक्षकांनी संशयीताला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
चौकशी दरम्यान संशयीताने कार्यालयात येण्यापुर्वी कचर्यात चाकू फेकल्याची माहिती समोर आली असून पोलीसांनी तो चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी महापौरांचे स्वीय सहाय्यक रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन शेख रफिक शेख रौफ रा.अली नगर, धार रोड याच्या विरुध्द नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सपोनी शिंदे करत आहेत. पोलीसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असून काम बंद आंंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापौरांच्या मध्यस्तीनंतर दुपार नंतर काम बंद आंदोलन मागे
या घटनेचा निषेध म्हणून अधिकारी, कर्मचारी संघटने तर्पेâ शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारा समोर घटनेच्या निषेर्धात काम बंद आंदोलन करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर सय्यद इकबाल यांच्या मध्यस्ती नंतर दुपारी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व कर्मचार्यांच्या सुरक्षित्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.