Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

आलेगाव-अकोला बस

पाठपुराव्याला यश; आलेगाव-अकोला बस सेवा पूर्ववत सुरू

Alegaon-Akola Bus: आमचे काम बोलते हे पुन्हा एकदा सिद्ध करत, आलेगाव परिसरातील प्रवाशांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला मार्गी लावण्यात सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांना मोठे यश आले आहे


पाठपुराव्याला यश आलेगाव-अकोला बस सेवा पूर्ववत सुरू

Alegaon-Akola Bus |


आलेगाव बसस्थानकावर ग्रामस्थांकडून एस.टी.चे उत्स्फूर्त स्वागत; चालक-वाहकांचा सत्कार

पातूर (Alegaon-Akola Bus) : "आमचे काम बोलते" हे पुन्हा एकदा सिद्ध करत, आलेगाव परिसरातील प्रवाशांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला मार्गी लावण्यात सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांना मोठे यश आले आहे. आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा पूर्ववत सुरू ठेवण्याच्या त्यांच्या आग्रही मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून, आज सकाळी १०:३० वाजता ही बस सेवा पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आली.

आलेगाव आणि (Alegaon-Akola Bus) परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, तसेच शिक्षक, शासकीय व खासगी कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन निलेश कापकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आल्याने संपूर्ण आलेगाव परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बसस्थानकावर जल्लोषात स्वागत

बस सेवा पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात आलेगाव बसस्थानकावर आज सकाळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. (Alegaon-Akola Bus) बस स्थानकावर दाखल होताच प्रवाशांनी व नागरिकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन बाळाभाऊ सरोदे यांनी केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी एस.टी.चे चालक व वाहक यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. तसेच, आलेगाववासीयांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व संबंधित अधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. यावेळी नितीन ढोणे, रवींद्र द्याईत, सुनील महल्ले, सचिन गिऱ्हे, उमेश राऊत, पुरुषोत्तम आवटे, रवी तायडे, चोथवे काका, यनकर भाऊ यांच्यासह परिसरातील नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.