Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

अतिवृष्टी अनुदान घोटाळा

मौजा भूलीच्या २०२३ अतिवृष्टी अनुदानात घोटाळा!

Rainfall Fund Scam: मौजा भुली येथील सन २०२३ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत देवानंद शिंदे व राजेश राठोड यांनी तहसीलदार स्मरणपत्र


मौजा भूलीच्या २०२३ अतिवृष्टी अनुदानात घोटाळा   

Rainfall Fund Scam |

 

दोषींवर कारवाई करून पात्र नागरिकांना अनुदान द्यावे!

मानोरा (Rainfall Fund Scam) : तालुक्यातील मौजा भुली येथील सन २०२३ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत देवानंद शिंदे व राजेश राठोड यांनी तहसीलदार यांना १ ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले आहे. तसेच येत्या १५ ऑगस्टपर्यंत वंचित नागरिकांना न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
     
जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अहवालात ग्रामस्तरीय समिती दोषी असल्याचे नमूद असतानाही गेली ३ वर्षे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.  उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या तक्रारीनंतरही स्थानिक प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे (Rainfall Fund Scam) दोषी ग्रामस्तरीय समिती सदस्य, सरपंच व पोलीस पाटील यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना तातडीने अतिवृष्टी अनुदानाचे वाटप करावे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. प्रशासन या प्रकरणावर काय निर्णय घेणार, याकडे भुली येथील शेकडो आपदग्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.