Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

महाराष्ट्र अर्थसंकल्प

सर्व समावेशक अर्थसंकल्प-भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांची पत्रकार परिषदेत माहिती

BJP Ganesh Hake: भाजपा प्रवक्ते गणेश हाके ने बताया कि नया बजेट महाराष्ट्र को प्रगतिशील बनाएगा, कृषि और शहरी विकास के लिए नई योजनाएं शामिल हैं।


सर्व समावेशक अर्थसंकल्प-भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांची पत्रकार परिषदेत माहिती 

BJP Ganesh Hake |

विकसित भारताचे प्रतिबिंब; सर्वाधिक रकमेचा अर्थसंकल्प जाहीर

परभणी (BJP Ganesh Hake) : शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन आधार, तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणार्‍या पक्क्या रस्त्याद्वारे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करणारा मेट्रो सारख्या सुविधाच्या माध्यमातून शहरी विकासाला चालना देणारा या वर्षीचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगतिशील बनवणारा, शाश्वत विकास करणारा, सुशासन देणारा आणि सर्वसमावेशक असल्याचे भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी सोमवार २३ मार्च रोजी सावली विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपा प्रवक्ते गणेश हाके (BJP Ganesh Hake) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाचा विस्ताराने आढावा घेऊन त्यातील सर्व समाज घटकासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदीची माहिती दिली. ते म्हणाले की विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साध्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराला महाराष्ट्राची मोलाची साथ मिळावी या दृष्टीने यावर्षीच्या अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे. शेती, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्राच्या विकासाचा मार्ग दाखवण्याबरोबरच या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला सुशासनाची, गतिमान प्रशासनाची अनुभूती देण्यासाठी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

 राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणार्‍यांना ५०००० रू प्रोत्साहन अनुदान, शेतीमालाला जागतिक बाजारपेठ, अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉप्ससॅप, महाडीबीटी इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकर्‍याला गतिमान बाजारपेठेशी जोडण्यास मदत करणारे आहेत असे गणेश हाके (BJP Ganesh Hake) यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून यावर्षी २५ लाख लखपति दीदी बनवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी सुमारे २० हजार कोटीची तरतूद सरकारने केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून १६ हजार मेगावॅट वीज निर्माण करण्यात येणार आहे. 

यातून शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होईल. नदीजोड प्रकल्पातून विकास साधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुर निवारण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २ हजार २४० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृष्णा खोर्‍यातील पुराचे पाणी भीमा खोर्‍यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळविण्यात येणार असल्याचे गणेश हाके (BJP Ganesh Hake) यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, डॉ.दराडे, बाळासाहेब जाधव, पं. स. दिलीप काळदाते उपस्थित होते.

Related to this topic: