Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

भेट एक, चर्चा अनेक; तटकरे–पवार भेटीने तर्क-वितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी (१२ तारखेला) रात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.


भेट एक चर्चा अनेक तटकरे–पवार भेटीने तर्क-वितर्कांना उधाण

Maharashtra Politics |

तटकरे–पवार भेटीमुळे राजकारणात खळबळ; रोहित पवारांचा २२ आमदारांचा दावा, तटकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

पुणे (Maharashtra Politics) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी (१२ तारखेला) रात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदारांसह आगामी निवडणुका भाजपमधून लढणार आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले. मावळचे आमदार सुनील शेळके हे देखील भाजपमधूनच निवडणूक लढवतील, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला.

याचबरोबर, शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवर टोला लगावत रोहित पवार म्हणाले, “कदाचित सुनील तटकरेंना ‘सिल्व्हर ओक’चा चहा आवडत असेल,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

तटकरेंची प्रतिक्रिया; ‘मी या वक्तव्याला किंमत देत नाही’

रोहित पवार यांच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंनी अत्यंत थोडक्यात उत्तर दिले. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, “मी त्या वक्तव्याला कोणतीही किंमत देत नाही,” असे म्हणत त्यांनी हा विषय एका वाक्यात संपवला.

सुनील शेळकेंचा पलटवार; ‘रोहित पवार खोटं बोलत आहेत’

रोहित पवारांच्या वक्तव्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार सतत खोटं बोलत आहेत. ते जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत असून प्रसिद्धीसाठी विविध वक्तव्ये करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “बारामतीतील पोटनिवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता. २०२९ मध्ये रोहित पवार काँग्रेसकडून बारामतीत निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्लॅन आहे, ही माहिती आम्हाला आहे. मात्र आम्ही ते उघडपणे बोलत नाही. रोहित पवार पक्षात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही.”

तटकरे–शरद पवार भेटीबाबत स्पष्टीकरण

दरम्यान, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, ही भेट पूर्णपणे सदिच्छा भेट होती आणि त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

तटकरे म्हणाले, “आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही काळापूर्वी ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. त्यानंतर त्यांना भेटण्याचा मानस होता, मात्र वेळ जुळून आला नव्हता.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या सहा दशकांपासून शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ही भेट राजकीय नव्हे, तर वैयक्तिक आणि परंपरेचा भाग होती. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आहे.”

राजकीय चर्चांना उधाण

तटकरे–पवार भेट, त्यानंतर रोहित पवारांचा दावा आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: