Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे

सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची बदली

API Shivsamba Gheware: सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची बदली लाचलूचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. गृह विभागाने २९ मे रोजी आदेश जारी केला


सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची बदली

API Shivsamba Gheware |

हिंगोली (API Shivsamba Gheware) : सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. या संदर्भात २९ मे रोजी गृह विभागाच्या वतीने आदेश काढण्यात आले आहेत. 

सध्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने २९ मे रोजी गृह विभागाच्या वतीने पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्याबाबत रात्री उशिरा आदेश काढले. ज्यामध्ये सायबर सेलचे (API Shivsamba Gheware) सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे.  मागील काही वर्षापूर्वी सपोनि शिवसांब घेवारे हे जिल्हा पोलिस दलात रूजू झाले होते.  कळमनुरी, बासंबा स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलच्या माध्यमातून त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणुन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. काहीवेळा परप्रांतात जाऊन गुन्ह्याचा तपास करावा लागला. दरम्यान घेवारे यापूर्वी २०१९ ते २०२२ दरम्यान पोउपनि पदावर कार्यरत होते. त्यानंतर  २०२३ ते २०२६ दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम केले.

Related to this topic: