Breaking News
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पोहरादेवी बणजारा विरासत

पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी व आढावा

Pohra Devi Banjara Heritage: मंत्री संजय राठोड पोहरादेवीतील 'बणजारा विरासत' संग्रहालयाचा दौरा करत असताना संग्रहालयाची सुविधा आणि विकासाचे कामे पहिल्या पातळीवर आढाव्यात आल्या.


पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी व आढावा

Pohra Devi Banjara Heritage |

मानोरा (Pohra Devi Banjara Heritage) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाला भेट देऊन  पाहणी केली तसेच संग्रहालयाच्या कामकाजाचा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांच्या समवेत  विजय दर्डा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, कारंजा प्र.उपविभागीय अधिकारी रवी महाले, उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश क्षीरसागर, मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप निपाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम फेरवाणी, कार्यकारी अभियंता (विद्युत) निता बोकाडे, महंत जितेंद्र महाराज आदी उपस्थित होते.

 दरम्यान, मंत्री संजय राठोड व मान्यवरांनी  सुरुवातीला बणजारा विरासत संग्रहालय (Pohra Devi Banjara Heritage) परिसरात असलेल्या सेवाध्वजास वंदन केले तसेच संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण केले. यावेळी  मंत्री  राठोड यांनी  संग्रहालयाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा, परिसर विकास आणि भविष्यातील नियोजनाबाबतही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी विजय दर्डा यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक व स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देत कृषी, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला. (Pohra Devi Banjara Heritage) बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि थोर व्यक्तींच्या कार्याचा वारसा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंत्री राठोड यांनी  ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.   

Related to this topic: