Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

मुरलीधर सुदाम येवले

​मुरलीधर सुदाम येवले (महाराज) यांची चिखली तालुका प्रमुखपदी निवड

Murlidhar Sudam Yeole: शेतकरी संघटना, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मुरलीधर सुदाम येवले (महाराज) (रा. महिमळ, ता. चिखली) यांची शेतकरी संघटनेच्या चिखली तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली


​मुरलीधर सुदाम येवले महाराज यांची चिखली तालुका प्रमुखपदी निवड

Murlidhar Sudam Yeole |


चिखली (Murlidhar Sudam Yeole) : शेतकरी संघटना, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मुरलीधर सुदाम येवले (महाराज) (रा. महिमळ, ता. चिखली) यांची शेतकरी संघटनेच्या चिखली तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी, ग्रामीण विकास व समाजहिताच्या कार्यात मुरलीधर येवले यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा व सक्रिय सहभाग लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष देविदास किसनराव कणखर यांच्या वतीने दि. ३१ जुलै २०२६ रोजी त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन या पदावर अधिकृत निवड करण्यात आली.

​आपल्या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या संघटनेसमोर मांडणे, शेतकरी हिताच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, संघटना विस्तार करणे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी कार्यरत राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Murlidhar Sudam Yeole) मुरलीधर येवले (महाराज) यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.