Breaking News
  • भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना
  • भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे
  • नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून
  • परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
  • शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

औसा जलसंधारण योजना

नाला खोलीकरणाची पाहणी करून आमदारांचा शेतकऱ्यांशी संवाद

Ausa Water Conservation Scheme: औसा तालुक्यातील जलसमृद्ध अभियानातील नाला खोलीकरण आणि सरळीकरण कामांवर आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांमुळे पावसाचे पाणी अधिक अडविण्यात


नाला खोलीकरणाची पाहणी करून आमदारांचा शेतकऱ्यांशी संवाद

Ausa Water Conservation Scheme |

औसा (Ausa Water Conservation Scheme) : क्रिएटिव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेशन, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्ध औसा अभियान व एकात्मिक विकास कार्यक्रमांतर्गत हिप्परगा व कवळी परिसरात सुरू असलेल्या नाला खोलीकरण, सरळीकरण व जलसंधारण कामांची मंगळवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांची सविस्तर माहिती घेतली तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिल्या.

जलसमृद्ध औसा अभियानाच्या (Ausa Water Conservation Scheme) माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्यात येत असून, हिप्परगा व कवळी येथे सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरण कामांमुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात अडविणे आणि जमिनीत मुरविणे शक्य होणार आहे. पाहणीदरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, जलसमृद्ध औसा अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करणे, भूजल पातळी वाढविणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. जलसंधारणाची कामे ही केवळ विकासकामे नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि शेतीला स्थैर्य देणारी महत्त्वाची गुंतवणूक आहे. नाला खोलीकरण, सरळीकरण आणि जलसाठा निर्मितीमुळे परिसरातील शेती, पशुपालन आणि ग्रामविकासाला निश्चितच चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

मराठवाड्यातील औसा आणि तुळजापूर हे तालुके सातत्याने अवर्षणग्रस्त परिस्थितीचा सामना करत आहेत. या (Ausa Water Conservation Scheme) पार्श्वभूमीवर आगामी काळात औसा तालुक्यातील ७३ अवर्षणग्रस्त गावांना जलसमृद्ध करण्याचा आपला मानस असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. जलसंधारणाच्या विविध उपक्रमांमुळे दुष्काळमुक्तीचा मार्ग अधिक सक्षम होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार तसेच क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारणाच्या कामांबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार, हिप्परगा येथील सरपंच संतोष गोरे, माळकोडजीचे सरपंच जयशंकर विभुते, टाका येथील उपसरपंच अतुल शिंदे, सदाशिव जोगदंड, गणेश माळी, डॉ. देशमुख, विलास काटे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अभियानाशी संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: