Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन

कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांचा अंत बघू नका; कणखर यांचा सरकारला इशारा

Farmers' Loan Waiver Andolan: रविकांत तुपकर यांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलन शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. कणखर सरकारने दबाव देण्याचा इशारा देत असून करजीमुक्ती, हक्कांचे पीकविमा


कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांचा अंत बघू नका कणखर यांचा सरकारला इशारा

Farmers' Loan Waiver Andolan |

 

तुपकरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

चिखली (Farmers' Loan Waiver Andolan) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. तुपकरांच्या या आंदोलनाला दुसरा दिवस उजाडला तरी सुद्धा आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने गावा गावातील शेतकरी आक्रमक होतांना दिसत असून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला असून शेतकरी संघटना बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी आज तहसीलदार चिखली यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिले. निवेदनात तुपकरांच्या आंदोलनातील मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात कणखर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, काही (Farmers' Loan Waiver Andolan) शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.शेतकऱ्यांचा अंत बघू नका रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची वेळीच दखल घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु असा थेट इशारा देत कणखर यांनी सरकारकडे सरसकट कर्जमुक्ती* देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा.हक्काचा पीकविमा  शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे, जगातील तंत्रज्ञान व बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात यावे,यासह आदि मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले आहे.

'तिव्र आंदोलन छेडू - देविदास कणखर 

कणखर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि पुढील (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार व प्रशासनाची राहील. यावेळी शेतकरी संघटनेचे ठाकूर सुनाजी लुदे, प्रकाश येडूजी धुळे,विनायक सरनाईक, बाजार समिती संचालक गणेश थुट्टे,राजु शेटे, मुरलीधर येवले,धोडु सोळंकी, विनोद थुट्टे,नरहरी थुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related to this topic: