Parbhani Irrigation Department: कडक उन्हामुळे शेतकर्यांचे पिके सुकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर कुलूप ठोकून वाढीव पाणी सोडण्याची मागणी केली.
कालव्यात पाणी सोडण्याची मागणी
फुलकळस,ताडकळस व परिसरातील शेतकर्यांचे आंदोलन
परभणी (Parbhani Irrigation Department) : संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट सुरु आहे. कडक उन्हामुळे शेतकर्यांची पिके सुकून जात आहेत. जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत लोहगाव उपविभागा अंतर्गत ताडकळस शाखा कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे कठीण परिस्थित सापडलेल्या संतप्त शेतकर्यांनी शुक्रवार २९ मे रोजी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ च्या कार्यालयास टाळे ठोकून वाढीव पाणी सोडण्याची मागणी केली.
तालुक्यातील लोहगाव उपविभाग ९ अंतर्गत येणार्या शाखा क्र. २० व १० ताडकळस क्षेत्र येते. या क्षेत्रात कालव्यामधून मिळणार्या पाण्याचा मोठा आधार होतो. मात्र सध्या तापमान ४३ अंशावर गेले आहे. उन्हामुळे या क्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. गुराढोरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक अडचणीत आले आहेत. वारंवार मागणी करुनही कालव्यात पाणी सोडले जात नाही. त्यामुळे शुक्रवार २९ मे रोजी फुलकळस, ताडकळस व परिसरातील संतप्त शेतकरी, ग्रामस्थांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर (Parbhani Irrigation Department) हल्ला बोल केला.
शेतकरी भर उन्हात कार्यालयावर पोहचले, मात्र एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी (Parbhani Irrigation Department) कार्यकारी अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनात उप सभापती काशिनाथ काळबांडे, मन्मथ नावकीकर, गजानन शिराळे, शिवधन शिराळे, वचिष्ट मिसाळ, दिनकर कुबडे, बसवेश्वर शिराळे, नागेश नावकीकर, ईश्वर शिराळे, अविनाश शिराळे, रितेश शिराळे, आदींचा सहभाग होता.