Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली कर्जमाफी आंदोलन

धनगरवाडीत शासनाच्या कर्जमाफी जीआरची होळी; सरसकट कर्जमाफीची मागणी

Hingoli Loan Waiver Protest: हिंगोलील धनगरवाडीत शासनाच्या करजमाफीच्या जावडीचा आकाराने फसवा असल्याचे आरोप करून शेतकर्यांनी त्याचा निषेध व सरसकट मागणी केली


धनगरवाडीत शासनाच्या कर्जमाफी जीआरची होळी सरसकट कर्जमाफीची मागणी

Hingoli Loan Waiver Protest |

हिंगोली/ सेनगाव (Hingoli Loan Waiver Protest) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे शेतकरी बांधवांनी शासनाच्या कर्जमाफीच्या जीआरचा तीव्र निषेध नोंदवला. शासनाचा जीआर फसवा असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी त्याची प्रतीकात्मक होळी केली आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी एल्गार पुकारला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला धनगरवाडी येथील शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याची शासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली. 

आंदोलनात सहभागी मान्यवर:
या आंदोलनात सरपंच विनोद विरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश उत्तमराव खडसे यांच्यासह संजय कुरुवाडे, भगवान बोरकर, दाजीबा जगताप, राजू कोरडे, कैलास खडसे, गणेश खडसे, सचिन कुरुवाडे, गजानन गणेश खडसे, सुरेश रघुनाथ कुरवाडे, गजानन गायकवाड, रामकृष्ण महाराज खोरणे व धनगरवाडीतील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
"शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही," असा निर्धार यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केला.

Related to this topic: