Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

महाराष्ट्र डॉजबॉल स्पर्धा

13 व्या राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ

Maharashtra Dodgeball Tournament: १३व्या सिनिअर राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा ४ ते ६ जून दरम्यान चिखली येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभात महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संस्थापक मंडळी, खेळाडू


13 व्या राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ

Maharashtra Dodgeball Tournament |

चिखली (Maharashtra Dodgeball Tournament) : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या मान्यतेने बुलढाणा जिल्हा डॉजबॉल असोसिएशन व श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ वी सिनिअर राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा भव्य शुभारंभ चिखली येथील श्री शिवाजी वसतीगृहाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. ४ ते ६ जून दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलीचे प्राचार्य डॉ. अनंतकुमार चेके यांनी भूषविले. उद्घाटन अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद मधुकररावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी (Maharashtra Dodgeball Tournament) डॉजबॉल खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेसह ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणाऱ्या संधींचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाला महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. हनुमंत लुंगे, उपाध्यक्ष राजेश जाधव, बुलढाणा जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते टी. ए. सोर, तालुका क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शेषनारायण लोढे तसेच श्री चंदनशेष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पद्माकर भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय चिखली अर्बन बँकेचे संचालक अभिजीतदादा राजपुत, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शरदनाना हाडे, आदर्श अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष विलास भाडाईत, मीनाताई वायाळ, संदीप पाटील, देवानंद नेमाने, आशिष जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करून खेळाडूंशी परिचय करण्यात आला व स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाली.

राज्यस्तरीय स्पर्धेतील (Maharashtra Dodgeball Tournament) सामने तीन दिवस रंगणार असून, ६ जून रोजी सकाळी ९ वाजता अंतिम सामने व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. विजेत्या संघांना आकर्षक चषक व पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बुलढाणा जिल्हा डॉजबॉल असोसिएशन, श्री चंदनशेष क्रीडा मंडळ, सवणा तसेच क्रीडा शिक्षक, स्वयंसेवक आणि स्थानिक क्रीडाप्रेमी परिश्रम घेत आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related to this topic: