Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

राज्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) महाराष्ट्रातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटी (DCC) अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


राज्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

Maharashtra Congress |

गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी विश्वजीत मारोतराव कोवासे यांची निवड

नागपूर (Maharashtra Congress) : अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) महाराष्ट्रातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटी (DCC) अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. या नियुक्त्यांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांतील नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी विश्वजीत मारोतराव कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत अहिल्यानगर शहर अध्यक्षपदी दीप चव्हाण, अहिल्यानगर ग्रामीण उत्तरसाठी गुजर सचिन रंगाराव, अहिल्यानगर ग्रामीण दक्षिणसाठी किरण अण्णासाहेब पाटील, अकोला शहरसाठी महेंद्र गवई, अकोला ग्रामीणसाठी प्रकाश तायाडे, अमरावती शहरसाठी बाबलू उर्फ नितीराज शेखावत, बीडसाठी राहुल पुरषोत्तम सोनवणे, भंडाऱ्यासाठी मुकुंद विनोद साखरखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच भिवंडी शहरसाठी आबिद खान मुन्सफ, बुलढाण्यासाठी प्रकाश रामभान आचार, चंद्रपूर शहरसाठी शिवा राव पोलिसेट्टी, चंद्रपूर ग्रामीणसाठी सुभाष रामचंद्रराव धोते, छत्रपती संभाजीनगर शहरसाठी सय्यद अक्रम सय्यद अब्बास, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी किरण अशोकराव पाटील, धाराशिवसाठी उमेश राजेनिंबाळकर, धुळे शहरसाठी खान मोहम्मद साबिर, धुळे ग्रामीणसाठी करनकल युवराज किशनराव, डोंबिवली शहरसाठी अमित भास्कर म्हात्रे, गोंदियासाठी अमर वराडे, हिंगोलीसाठी डॉ. सतीश यशवंतराव पाचपुता, इचलकरंजी शहरसाठी संजय महादेव कांबळे आणि जळगाव शहरसाठी जमील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या तयारीला वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Related to this topic: