Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

चान्नी–सुकळी मार्ग

चान्नी–सुकळी फाटा मार्ग पुन्हा 'जैसे थे'; लाखोंचा खर्च पाण्यात

Channi–Sukali Road: पातूर तालुक्यातील चान्नी ते सुकळी फाटा या मुख्य मार्गाची मे महिन्यात करण्यात आलेली डागडुजी अवघ्या दोन महिन्यांतच निकामी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे


चान्नी–सुकळी फाटा मार्ग पुन्हा जैसे थे लाखोंचा खर्च पाण्यात

Channi–Sukali Road |

डागडुजी झालेल्या रस्त्याची दोन महिन्यांतच चाळणी

पातूर (Channi–Sukali Road) : पातूर तालुक्यातील चान्नी ते सुकळी फाटा या मुख्य मार्गाची मे महिन्यात करण्यात आलेली डागडुजी अवघ्या दोन महिन्यांतच निकामी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडल्याने मार्गाची दुरवस्था झाली असून, डागडुजीसाठी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या निधीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चान्नी, सुकळी, खेट्रीसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज न आल्याने वाहनांचे नुकसानही होत आहे.

डागडुजीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चौकशीची मागणी 
रस्त्याच्या डागडुजीदरम्यान (Channi–Sukali Road) संबंधित अभियंता अथवा वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी फिरकले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ठेकेदारांनी केवळ औपचारिक स्वरूपाची डागडुजी केल्यामुळे दोन महिन्यांतच रस्त्याची पुन्हा चाळणी झाल्याची चर्चा परिसरात आहे. कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

Related to this topic: