Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

स्व. भारतभाऊ बोंद्रे

स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या कार्याचा गौरव; आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडून स्मृतिपत्र प्रदान

Late Bharatbhau Bondre: चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्रचे माजी मंत्री स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्मरणार्थ सन्मानपत्र आणि स्मृतिपत्र प्रदान केले.


स्व भारतभाऊ बोंद्रे यांच्या कार्याचा गौरव आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडून स्मृतिपत्र प्रदान

चिखली (Late Bharatbhau Bondre) : 28 मे 2026 रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आलेले सन्मानचिन्ह व स्मृतिपत्र परिवाराच्या सुपूर्द करण्यात आले.

स्व. भारतभाऊ बोंद्रे (Late Bharatbhau Bondre) यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला. कै. भारत राजाभाऊ बोंद्रे यांचा जन्म १ ऑगस्ट १९४३ रोजी चिखली येथे झाला होता. त्यांनी बी.एस्सी. आणि एलएल.बी. पर्यंत शिक्षण घेतले होते. सार्वजनिक जीवनात त्यांनी विवेकानंद व्यायामशाळेचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष तसेच चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले.

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर जिगाव प्रकल्प, पेन टाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प आणि नळगंगा प्रकल्प उभारणीतही त्यांनी विशेष योगदान दिले. शेतकऱ्यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाली तर ग्रामीण भाग समृद्ध होईल, या ध्येयातून त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना चालना दिली. स्व. भारतभाऊ बोंद्रे हे १९७२, १९८०, १९८५ आणि १९९० या कालावधीत चार वेळा चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. जून १९८८ ते मार्च १९९० या काळात त्यांनी पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री म्हणून तर मार्च १९९० ते जून १९९१ या कालावधीत उद्योग, शिक्षण व तंत्रशिक्षण खात्यांचे मंत्री म्हणून कार्य केले.

त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र विधानसभेने ८ डिसेंबर २०२५ रोजी एकमताने शोकप्रस्ताव संमत करून आदरांजली वाहिली होती. यावेळी स्व. भारतभाऊ बोंद्रे (Late Bharatbhau Bondre) यांच्या अर्धांगिनी लक्ष्मीबाई बोंद्रे  यांना स्मृतिपत्र सुपूर्द करण्यात आले.प्रसंगी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, अप्पर तहसीलदार सौरभ गावंडे, मंडळधिकारी ए. टी. शेळके, शंतनू बोंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

Related to this topic: