Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासदार अशोकराव चव्हाण

मोंढा परिसरातील मालमत्ता धारकांच्या प्रश्नावर अशोकराव चव्हाणांची ठाम भूमिका; अन्याय होऊ देणार नाही

MP Ashokrao Chavan: माहिती मंत्रालयाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मोंढा परिसरातील शेकडो कुटुंबांच्या आयुष्यातील कष्टांचे समाधान करून मालमत्ता धारकांना पाठिंबा दिला. त्यांनी अन्याय न होईल


मोंढा परिसरातील मालमत्ता धारकांच्या प्रश्नावर अशोकराव चव्हाणांची ठाम भूमिका अन्याय होऊ देणार नाही

MP Ashokrao Chavan |

हिंगोली (MP Ashokrao Chavan) : आज ओमप्रकाश देवडा बँकेचे उपाध्यक्ष मा. सुनीलजी देवडा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मोंढा परिसरातील मालमत्ता धारकांना प्राप्त झालेल्या नोटिसींच्या संदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले. मोंढा परिसरातील शेकडो कुटुंबांच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई आणि त्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर श्री. चव्हाण यांनी अत्यंत आत्मीयतेने चर्चा केली. मालमत्ता धारकांच्या भावना, त्यांची चिंता आणि समोरील अडचणी समजून घेत त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

“कोणत्याही मालमत्ता धारकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. या लढ्यात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशी दिलासादायक ग्वाही यावेळी चव्हाण (MP Ashokrao Chavan) यांनी दिली. त्यांच्या या शब्दांमुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या नागरिकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला असून न्याय मिळेल हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या भेटीनंतर मोंढा परिसरातील सर्व मालमत्ता धारकांनी एकजुटीने राहून संयम बाळगावा, न्याय निश्चित मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. या प्रश्नावर चव्हाण (MP Ashokrao Chavan) यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related to this topic: