Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Maharashtra Assembly

रुग्णांच्या वेदनांना विधानसभेत वाचा; आरोग्य सुविधांसाठी श्वेता महाले आक्रमक

चिखली मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत आवाज उठविला.


रुग्णांच्या वेदनांना विधानसभेत वाचा आरोग्य सुविधांसाठी श्वेता महाले आक्रमक

Maharashtra Assembly |

ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, नवीन आरोग्य केंद्रे आणि प्रलंबित कामांसाठी आरोग्यमंत्री विशेष बैठक घेणार

चिखली (Maharashtra Assembly) : चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रभावीपणे आवाज उठविला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी करत मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेल्या एका नवजात बालकाच्या कुटुंबाला आलेल्या अडचणींचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सलग शासकीय सुट्ट्यांमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क होऊ न शकल्याने उपचार पूर्ण होऊनही बालकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकला नव्हता. अशा परिस्थितीत दाखल केलेल्या फाईलच्या आधारे रुग्णांना तातडीने डिस्चार्ज देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

याशिवाय चिखली मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या विस्तारासंदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. चिखली येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन, धाड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये रूपांतर, अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन, मासरूळ येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, तसेच धोडप येथे मंजूर झालेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच रायपूर (ता. जि. बुलढाणा) आणि उदयनगर (उंद्री) (ता. चिखली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामे सुरू झाली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली. ही कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चिखली मतदारसंघातील विविध शासकीय रुग्णालयांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात त्यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

चिखली मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला.

Related to this topic: