Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

एलपीजी ऑटो जळून खाक

परभणीत एलपीजी अ‍ॅटो जळून खाक; वसंतराव नाईक पुतळा परिसरातील घटना

LPG Auto Burn: परभणीमध्ये एलपीजीवर चालणारा ऑटो पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, त्यामुळे आर्थिक मदतीची मागणी उठली.


परभणीत एलपीजी अ‍ॅटो जळून खाक वसंतराव नाईक पुतळा परिसरातील घटना

LPG Auto Burn |

डायल ११२ व अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

परभणी (LPG Auto Burn) : शहरातील वसमत रोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात बुधवार   १ एप्रिल  रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका एलपीजीवर चालणार्‍या ऑटो रिक्षाला अचानक आग लागून तो पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने ऑटोमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

 घटने बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वसमत रोड परिसरात बुधवारी  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.  एमएच २२ एपी ३२४२ क्रमांकाचा एलपीजीवर चालणारा ऑटो रिक्षा बसस्थानकावर प्रवासी सोडून वसमतरोडकडून काळीकमानकडे जात असताना अचानक (LPG Auto Burn) त्याच्या मागील बाजूस धूर निघू लागला. चालकाने तत्काळ ऑटो थांबवून पाहणी केली असता काही क्षणातच ऑटोने भीषण पेट घेतला. आगीची तीव्रता वाढत गेल्याने परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. ऑटोमध्ये एलपीजी गॅस असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने जवळ जाणे टाळले. दरम्यान, डायल ११२ वर कार्यरत पोशि रायबोळे यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत अग्निशमन दलाला पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ऑटो पूर्णपणे जळून खाक (LPG Auto Burn) झाला होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर ऑटो रिक्षाचे मालक ज्ञानेश्वर शंकरराव दामोदर (रा. पिंगळी) हे असल्याचे समजते. घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोउपनि बनाटे, एएसआय सिद्दिकी, लोखंडे, सपकाळ तसेच महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव माजरमकर आदिनी भेट दिली. 

प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

या (LPG Auto Burn) घटनेत एलपीजीवर चालणारा ऑटो पूर्णत: जळून खाक झाल्याने संबंधित चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणार्‍या या चालकासाठी हा ऑटोच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने त्याच्यासमोर आता उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे त्याच्या कुटुंबावरही आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा आपत्तीग्रस्त चालकाला शासन व प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related to this topic: