Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आरसोडामध्ये सिंधीसह दारू नष्ट

आरमोरी तालुक्यातील आरसोडा येथे मुक्तिपथ अभियान आणि ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवसीय सघन भेट उपक्रम राबविण्यात आला.


आरसोडामध्ये सिंधीसह दारू नष्ट

Liquor Ban Drive |

८ विक्रेत्यांकडून लिहून घेतले शपथपत्र

गडचिरोली (Liquor Ban Drive) : आरमोरी तालुक्यातील आरसोडा येथे मुक्तिपथ अभियान आणि ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवसीय सघन भेट उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून दोन दारू व सिंधी विक्रेत्यांवर अहिंसक कृती करून सुमारे १०,००० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तसेच ८ विक्रेत्यांकडून 'यापुढे दारू विकणार नाही' अशा आशयाचे शपथपत्र लिहून घेण्यात आले.

आरसोडा येथील सघन गाव भेटीच्या पहिल्या दिवशी प्रकाश भोयर यांच्या निवासस्थानी युवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगरसेवक सूरज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेविका सुनीता भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत 'मुक्तिपथ ग्रामीण/शहरी युवा संघटना' गठीत करण्यात आली. गावात चालणारी अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सहारे व पोलीस कॉन्स्टेबल यांनी दोन विक्रेत्यांकडील १०,००० रुपये किमतीची दारू व सिंधी नष्ट केली.

गाव भेटीच्या दुसर्‍या दिवशी युवा संघटना, गाव/वार्ड संघटना आणि मुक्तिपथ शक्तीपथ स्त्री संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे ८ दारू विक्रेत्यांची भेट घेतली. या मोहिमेत नगरसेवक सूरज भोयर, नगरसेविका सुनीता भोयर, पोलीस पाटील अतुल भोयर यांच्यासह युवक सहभागी झाले होते. मुक्तिपथचे तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी उपस्थितांना दारूबंदी (Liquor Ban Drive) कायद्याची सविस्तर माहिती दिली. 

Related to this topic: