Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

विधान परिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीची भीती? उमेदवार अद्याप जाहीर नाही

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.


विधान परिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीची भीती उमेदवार अद्याप जाहीर नाही

Legislative Council Election |

वर्धा (Legislative Council Election) : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसल्याने बंडखोरीची भीती तर वाटत नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे उमेदवार जाहीर झालेला नसतानाही भाजपच्या नगरसेवकांना चंद्रपूर येथे अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपकडून उमेदवाराची घोषणा शेवटच्या टप्प्यात करण्यामागे पक्षांतर्गत असंतोष किंवा संभाव्य बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उमेदवार लवकर जाहीर झाल्यास इच्छुक उमेदवार किंवा त्यांचे समर्थक नाराज होऊन बंडखोरीची भूमिका घेऊ शकतात, अशी भीती पक्ष नेतृत्वाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे योग्य वेळ साधून अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ही निवडणूक सहज होईल असे चित्र नाही. विरोधकांकडूनही जोरदार तयारी सुरू असून मतदारांची संख्या आणि संभाव्य राजकीय समीकरणे लक्षात घेता या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपला केवळ विरोधकांशीच नव्हे तर पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीशीही सामना करावा लागू शकतो.

उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होणार असल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भाजपकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी होणार याकडे कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून सध्या मात्र राजकीय चर्चांना आणि तर्कवितर्कांना जोर आला आहे. त्यामुळे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

दरम्यान, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या भाजपकडून अधिकृत उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे. याकरिता वर्धा नगर परिषदेच्या सदस्यांना सकाळी १० वाजता चंद्रपूर येथील ‘निवडणूक निर्णय अधिकारी’ कार्यालयात उपस्थित राहावे, असा संदेश भाजप नेत्यांकडून पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Related to this topic: