Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर महानगरपालिका

शिवसेनेचा पालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम!

Latur Municipal Corporation: शहरात बांधकाम प्रकरणामध्ये कागदपत्रांची असत्यता आढळल्यास व नियमावलीतील अटींचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांमध्ये अर्जदार/जागा मालक, संबंधित सल्लागार अभियंता/आर्किटेक


शिवसेनेचा पालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम

Latur Municipal Corporation |

 

१५ ऑगस्टला प्रशासनास काळे झेंडे दाखवून करणार निषेध!

लातूर (Latur Municipal Corporation) : शहरात बांधकाम प्रकरणामध्ये कागदपत्रांची असत्यता आढळल्यास व नियमावलीतील अटींचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांमध्ये अर्जदार/जागा मालक, संबंधित सल्लागार अभियंता/आर्किटेक यांच्यावर कारवाई करून संबंधित सल्लगार अभियंता/आर्किटेक यांची नांवे काळया यादीत टाकण्याची तात्काळ कारवाई करावी या मागणी सर इतर पाच मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्तांना 14 आगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला. या सर्वच प्रकरणात 14 आगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट ला प्रशासनाला काळे झेंडे दाखवून शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने मंगळवारी (दि.२९) दिला आहे.

महापालिका (Latur Municipal Corporation) हद्दीतील रिंग रोड लगतचे सर्विस रोडवरील अतिक्रमण काढून जनतेच्या वापरासाठी हे रस्ते खुले करावेत. नगर रचना विभागा मार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या सर्व विकास परवानगी व गुंठेवारी दस्ताऐवज महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दर्शवावे. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यासाठी कायमस्वरूपी शिडीची व्यवस्था करावी.  

विकास आकार (Development charge) निधी अपहार प्रकरणी चौकशी करून मनपा मधील मुख्य लेखाधिकारी श्री. रावसाहेब कोलगणे व तत्कालीन सर्व मुख्य लेखाधिकारी व आयुक्त यांची चौकशी करावी. लातूर शहरातील अनेक कोचिंग क्लासेस इमारती, शैक्षणिक संस्था, वस्तीगृहे व इतरही बहुमजली इमारतीचे फायर ऑडीट कारवाई करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळेस देण्यात आले. याबाबत शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्याचे संदर्भ या निवेदनात देण्यात आले. या सर्व प्रकरणात 14 ऑगस्ट च्या आत कारवाई करावी अन्यथा 15 ऑगस्टला शिवसेनेच्या वतीने प्रशासनास काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करण्यात येईल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदींना देण्यात आल्या आहेत.

यांचा शिष्टमंडळात समावेश...
या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पप्पुभाई कुलकर्णी, जिल्हा संघटिका शोभाताई बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महिला आघाडी जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, तालुकाप्रमुख  शंकर रांजणकर, शहर प्रमुख माधव कलमुकले, शिवराज मुळावर, आरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, फेरीवाला संघटनेचे हनुमंत पडवळ, ॲड. युवराज इंगोले, तानाजी करपुरे, विष्णू कांबळे, संतोष माने, प्रविण मगर, मारुती सावंत, मुनीरखॉं पठाण, समद शेख, ऋषीकेश पाटील, करण शिंदे, आत्मलिंग फेसगाळे, नेताजी ऐतनबोने, सुरज बाहेती, मारुती सूर्यवंशी, सुजित बिसेन, लक्ष्मण घोणे, विष्णू घोडके, आण्णा कोळेकर, परमेश्वर देशमुख, भारत सोनवणे, पप्पू राठोड, गिरी महाराज, शालु बनसोडे, मीनाक्षी पांचाळ, ललीता बावलगे, नितीन साबळे, उमाकांत लांडगे, विनोद क्षीरसागर, लक्ष्मी काळे, कृष्णा बिडवे, प्रसाद बसपुरे, अक्षय चवळे, अमित हांडे, राम चोथवे,  अभिजीत कांबळे, पप्पू जाधव, पृथ्वीराज कांबळे, प्रज्वल कांबळे, दादा पारवे, गणेश चव्हाण, पवन शाहीर, शुभम गायकवाड, दीपक कांबळे, शंभू जोगदंड, रोनक कसबे, व इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Related to this topic: