Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर पोलिस

३.५ लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत!

Latur Police: सदर बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस व झुमके असल्याचे आढळून आले. घटनास्थळी व परिसरात तात्काळ चौकशी


३५ लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत 

Latur Police |

 

लातूरच्या पोलिसांची कर्तव्यनिष्ठा ठरली कौतुकाचा विषय!

लातूर (Latur Police) : स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बेवारस बॅग पोलिसांनी मूळ मालकाचा शोध घेऊन केली सुपूर्द केली. पोलिसांच्या या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत माहिती अशी की, ११ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे हे स्टाफसह जिल्हा रात्रगस्तीवर असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर मध्यभागी एक बॅग पडलेली दिसून आली. संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवून सदर बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे तसेच एका बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस व झुमके असल्याचे आढळून आले. घटनास्थळी व परिसरात तात्काळ चौकशी करण्यात आली. मात्र त्यावेळी बॅगेचा मालक अथवा संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. प्रथमदर्शनी सदरची बॅग एखाद्या प्रवाशाच्या वाहनातून पडल्याचे लक्षात आल्याने ती सुरक्षितरित्या (Latur Police) पोलीस ठाणे मुरुड येथे जमा करण्यात आली.  त्यानंतर पोलिसांनी विविध माध्यमांतून चौकशी करून मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू ठेवण्यात आले.

अखेर तपासादरम्यान सदर बॅग ही संदीप मंगलदास सुरनर (वय ३३ वर्षे रा. रुद्धा ता. अहमदपूर जि. लातूर) यांची असल्याचे व त्यामधील सोन्याचे दागिने हे त्याच्या पत्नीचे असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती संदीप सुरनर हे दिनांक ११ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह ऑटो रिक्षाने रुद्रा येथून पुण्याकडे जात असताना मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची बॅग वाहनातून पडून हरवल्याचे समोर आले.

सदर बॅगेतील कपड्यांचे तसेच सोन्याच्या दागिन्याची ओळख, मालकी हक्काची पडताळणी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते मौल्यवान दागिने मूळ मालकास परत करण्यात आले.

यांनी केली कामगिरी.
सदरची उल्लेखनीय कामगिरी (Latur Police) पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, पाराजी पुट्टेवाड, ज्ञानोबा गुडमेवाड व ढवळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.