Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नीट परीक्षा घोटाळा

नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये मनसेची निदर्शने

NEET exam scam: नीट पेपर घोटाळ्यातील आरोपी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचा विरोध करून लातूरमध्ये मनसेचे निदर्शने झाले.


नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये मनसेची निदर्शने

NEET exam scam |

लातूर (NEET exam scam) : नीट पेपर घोटाळ्यातील आरोपी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेच्या वतीने अंडा फेक करीत निदर्शने करण्यात आली. मंगळवारी लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या मुख्यालयासमोर मनसेचे शहराध्यक्ष मनोज अभंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

लाखों विद्यार्थ्यांचे नुकसान या पेपर फुटीमुळे झाले असून महाराष्ट्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या क्लास मधील हजारो विद्यार्थ्यांची फीस परत मिळावी व त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी (NEET exam scam) आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, रेणापूर नगरपंचायत नगरसेवक वाहेदभाई शेख, लातूर शहर संघटक बजरंग ठाकूर, अनिल जाधव, जहांगीर शेख, सय्यद सरफराज, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इंद्रजीत माने, गफ्फार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Related to this topic: