Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर रिमझिम पाऊस

लातूर जिल्ह्यात मान्सूनची रिमझिम हजेरी

Latur Drizzle Rain: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी चार दिवस लातूर जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यासाठी यंदाचे मृग नक्षत्र कोरडे गेले.


लातूर जिल्ह्यात मान्सूनची रिमझिम हजेरी

Latur Drizzle Rain |

लातूर (Latur Drizzle Rain) : लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी मान्सूनची रिमझिम हजेरी लागली. मान्सून ने उशिरा का होईना म्हणजे आर्द्रा नक्षत्रात दस्तक दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी चार दिवस लातूर जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यासाठी यंदाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी जिल्ह्यात जवळपास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात रिमझिम पावसाने हजेरी लावली. 

मृग नक्षत्र 22 जून रोजी संपले. आर्द्रा नक्षत्रात दुसऱ्या दिवशी (Latur Drizzle Rain) पावसाने रिमझिम का होईना जिल्हाभरात दस्तक दिल्याने शेतकरी सुखावला आहे. हवामान खात्याने चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून चार दिवसात पाऊस पेरणी योग्य होईल का, याची उत्सुकता लागली आहे. बुधवारी लातूर सह तालुक्याच्या काही भागात, औसा तालुक्यातील भादा, आलमला परिसरात, निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरात, चाकूर तालुक्यात, उदगीर तालुक्यातील उदगीर व वाढवणा परिसरात तसेच रेणापूर तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळविले आहे.