Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लातूर भाजप आंदोलन

काँग्रेसच्या निषेधार्थ उद्या भाजपाचे आंदोलन; शहर जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत घोषणा

Latur BJP Protest: लातूर शहराचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी लातूर शहरात भाजपाने आंदोलनाचा एल्गार पुकारला. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील


काँग्रेसच्या निषेधार्थ उद्या भाजपाचे आंदोलन शहर जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत घोषणा

Latur BJP Protest |

 

लातूर (Latur BJP Protest) : लातूर शहराचे आमदार आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी लातूर शहरात भाजपाने आंदोलनाचा एल्गार पुकारला. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

बुधवारी झालेल्या लातूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय सत्ताधारी काँग्रेस पक्षाने एकाधिकारशाहीने मंजूर केले आहेत. सर्वसामान्य नगरसेवकाचे म्हणणे ऐकून न घेता काँग्रेसने हे विषय मंजूर केले. काँग्रेस पक्षाकडून यापूर्वी लातूरमध्ये पुतळ्याच्या उभारणीवरून सातत्याने वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप यावेळी शहर जिल्हाध्यक्षांनी केला.

शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक लातूर महानगरपालिका प्रांगणामध्ये उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी शासनाच्या वतीने आर्थिक तरतुदीची घोषणाही केली होती. मात्र काँग्रेसने चाकूरकरांचे स्मारक आदर्श कॉलनी उभारण्याचा विषय आणून काँग्रेस पक्षाचे नेते राहिलेल्या चाकूरकरांच्या स्मारकाविषयी वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी गांधी चौकात भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

या (Latur BJP Protest) पत्रकार परिषदेला भाजपाचे गटनेते दीपक मठपती, नगरसेवक गिरीश पाटील, नगरसेवक गणेश गवारे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.