Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लाचखोर भुकरमापक निलंबन

भुमिअभिलेखमधील दोन्ही भुकरमापक लाचखोराचे निलंबन

BrBribery Appraiser Suspension: हिंगोलीतील भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापक लाच मागण्याकरिता बासंबा येथे जमिनी मोजण्याकरीता लाच स्विकारले. त्यामुळे पोलीसाने त्यांना पकडून लाचखोरांवर निलंबन आदेश


भुमिअभिलेखमधील दोन्ही भुकरमापक लाचखोराचे निलंबन

Bribery Appraiser Suspension |

 

उपसंचालक भुमि अभिलेख  छत्रपती संभाजी नगर, कार्यालयाने काढले निलंबन आदेश

हिंगोली (Bribery Appraiser Suspension) : बासंबा येथे शेतगट क्रमांक ६५८ मध्ये ३६ आर शेत जमीनीची मोजणी करण्याकरीता उपाधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय, हिंगोली मधील दोन भुकरमापकांनी लाचेची मागणी करून १० हजार रुपये लाच स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ मे रोजी दोघांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अहवाल (Bribery Appraiser Suspension) भुमिअभिलेख कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविला होता. यावरून उपसंचालक भुमिअभिलेख छत्रपती संभाजी नगर येथील वरिष्ठ कार्यालयाने दोन्ही लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश ३ जून रोजी काढले.

उपाधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय हिंगोलीे येथील (Bribery Appraiser Suspension) भुकरमापक उमेश मधुकर राऊत व अविनाश नंदकिशोर गोरे यांनी एका व्यक्तीशी बासंबा शिवारातील जमिन मोजणी करण्याकरीता १५ हजाराची लाच मागितली होती. त्यातील १० हजार रुपये लाच घेताना दोघांना हिंगोली येथील भुमिअभिलेख कार्यालयात पकडले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीसात २३ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. दोघांना न्यायालयात हजर केले असता २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांना ९ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. १ जूनला त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होऊन जामिनवर मुक्तता करण्यात आली होती. लाचेचा दाखल झाल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्यावर उपसंचालक भुमिअभिलेख छत्रपती संभाजी नगर या वरिष्ठ कार्यालयाने भुकरमापक उमेश मधुकर राऊत व अविनाश नंदकिशोर गोरे या दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

उपाधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय हिंगोली येथील भुकरमापक उमेश मधुकर राऊत, अविनाश नंदकिशोर गोरे या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे यांच्या गैरकृत्याने विभागाची व शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका दोघांवर ठेवून उपसंचालक भुमिअभिलेख छत्रपती संभाजी नगर या वरिष्ठ कार्यालयाने दोघांच्या निलंबनाचे आदेश ३ जूनला काढले.

Related to this topic: