Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

आ. संभाजी पाटील निलंगेकर

परजिल्ह्याकडे वळवली मंजूर खताची रॅक!

MLA Sambhaji Patil Nilangekar: लातूर जिल्ह्यात खताची रॅक इतर जिल्ह्याकडे वळवण्यात आल्यावर, माजी आमदार आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी तक्रार केली. जिल्हाधिकारीने चौकशीचा आदेश दिला


परजिल्ह्याकडे वळवली मंजूर खताची रॅक

MLA Sambhaji Patil Nilangekar |

 

माजी मंत्री आ. निलंगेकरांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश

लातूर (MLA Sambhaji Patil Nilangekar) : खरीप हंगामाच्या तोंडावरच लातूर जिल्ह्यास मंजूर झालेली खताची रॅक परजिल्ह्याकडे वळविल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांना मिळताच निलंगेकरांनी तात्काळ यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत. लातूर जिल्ह्यास मंजूर झालेली खताची रॅक परजिल्ह्याकडे वळवली गेली असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांना प्राप्त झाली.

या माहितीची खातरजमा करून घेतल्यानंतर माजी मंत्री आ. निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांनी तात्काळ या बाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती. याप्रकरणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्ह्याधिकार्‍यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले असून आगामी काळात या प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाय योजना करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर आगामी काळातही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वेळेवर व मुबलक खत होऊन खताच्या किंंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य  कार्यवाही करण्याची मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागास तात्काळ निर्देश देऊन यासंदर्भात कोणतीही दिरंगाई करू नये, अशी सूचना दिली आहे.

आमदार निलंगेकर यांचे सर्वत्र कौतुक...

शेतकर्‍यांच्या दृष्टीने खरिपाचा हंगाम अंत्यत महत्वाचा असून या हंगामावरच शेतकर्‍यांचे अर्थचक्र अवलंबून असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी होत असते. या पेरणीसाठी आता लगबग सुरु झालेली असून शेतकर्‍यांकडून बियाणे व खताची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. या हंगामात शेतकर्‍यांना बियाणे व खताची टंचाई भासू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जिल्हाप्रशासनाला दिले आहेत. मात्र लातूर जिल्ह्यासाठी आलेली खताची रॅक इतर जिल्ह्याकडे वळविल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे लातूर जिल्ह्यामध्ये खताची टंचाई असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. मात्र आमदार निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची दखल घेत खेड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याने आमदार निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.