Breaking News
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना
  • गोकुळ निवडणुकीत ‘हलाल सर्टिफिकेट’चा नवा वाद
  • कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार
  • व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकाऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी- देवेंद्र फडणवीस
  • गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला
  • वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

कोरपना वादळ तडाखा

कोरपना तालुक्यात वादळाचा तडाखा; चनई खुर्द येथील नंदविजय जिनिंगचे शेड कोसळले...

Korpana storm hits: कोरपना () : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका २५ वर्षीय युवक आणि एका बैल


कोरपना तालुक्यात वादळाचा तडाखा चनई खुर्द येथील नंदविजय जिनिंगचे शेड कोसळले

Korpana storm hits |

 

वीज पडून युवक व बैलाचा मृत्यू; मोठे नुकसान

कोरपना (Korpana storm hits) : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका २५ वर्षीय युवक आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला असून, नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळ दरम्यान शेरज बूज येथील शेतशिवारात असलेल्या संयोग चंद्रकांत लोडे (२५) या युवकाच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंदपूर येथे शेतात बांधून असलेल्या विकास वामन खडसे यांच्या मालकीच्या बैलावरही वीज कोसळली. यात हा बैल जागीच दगावला. एका उमद्या युवकाच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तसेच तालुक्यात  गाय,बैल, बकऱ्या कोंबड्या अशी अनेक पशु  दगावली असून काही जनावरे जखमी झाल्याची माहिती समोर येत असून, याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की चनई खु. येथील नंदविजय फार्मर प्रोड्युसिंग कंपनी जिनिंग मधील विशाल लोखंडी शेड पूर्णपणे कोसळले. यामुळे शेडखाली ठेवलेली सरकी यंत्रसामग्री व इत्तर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून जिनिंग कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. 

या (Korpana storm hits) वादळाचा कोरपना तालुक्यातील कोरपना, कन्हाळगाव, अकोला, पारडी, शेरज बूज, माथा, धोपटाळा, मांडवा, वनसडी, कोडशी बूज, कोडशी खुर्द, गोविंदपुर, रायपूर, मांडवा, खैरगाव,  हेटी,गांधीनगर, तांबाडी, तुकडोजीनगर, पिंपरी, मेहंदी, चनई बूज, चनई खुर्द,पांडूगुडा, चोपण, जेवरा, खडकी, रूपापेठ आदी गावांना मोठा फटका बसला
वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक गावांमधील घरांची टिन पत्रे , शेतशिवारातील शेड हवेत उडून गेली. त्यामुळे तेथे ठेवलेले शेती उपयोगी साहित्य , खते ,अन्नधान्य , संसारोपयोगी साहित्याची मोठी नासधूस झाली आहे. अनेक नागरिक उघड्यावर आले असून, घर कोसळल्याने व पत्रे लागल्याने काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

तसेच, रस्त्यांवर आणि गावांमध्ये मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्यामुळे व तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये महावितरण कंपनीचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.याचबरोबर फुटपाथ विक्रेते , व्यावसायिक , लग्नसमारंभ आदीची वादळामुळे मोठी तारांबळ उडाली.

अकोला व पारडी येथे सर्वाधिक नुकसान

वादळी वाऱ्यामुळे (Korpana storm hits) अकोला व पारडी या गावात सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले गेले. झालेल्या नुकसानामुळे त्यांना रात्र उघड्यावरच काढावी लागली. 

आपतग्रस्त गावांना आमदारांची भेट

घटनेची माहिती मिळताच आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने आपतग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी बाधित नागरिकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि परिस्थितीची पाहणी केली. तसेच, नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य ती मदत पुरवण्यासाठी आणि पंचनामे करण्याचे निर्देश उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.