Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर पोलिस गुन्हा

सोनेरी नाण्यांच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक; पातूर पोलिसांत गुन्हा

Patur Police Case : सोनेरी नाण्यांचा मोठा साठा स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील एका व्यक्तीची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.


सोनेरी नाण्यांच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक पातूर पोलिसांत गुन्हा

Patur Police Case |

पातूर (Patur Police Case) : सोनेरी नाण्यांचा मोठा साठा स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर येथील एका व्यक्तीची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पातूर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज चांदोबा कांबळे (वय ४९, रा. शिवपार्वती पार्क, ओम साई निवास, वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश रमेश इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने ३० जून २०२६ रोजी फिर्यादीला फोन करून पूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या ओळखीचा आधार घेत आपल्या बहिणीचे घर पाडताना सुमारे साडेतीन किलो वजनाच्या सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे सांगितले. हा ऐवज ५० लाख रुपयांत विकण्याची तयारी असल्याचेही त्याने सांगितले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने एक नाणे फिर्यादीला दिले. ते नाणे सोनाराकडे तपासणीसाठी नेले असता ते खरे सोने असल्याचे आढळल्याने फिर्यादीचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी नांदखेड फाटा (ता. पातूर) येथे फिर्यादीने आरोपीला रोख १५ लाख रुपये दिले. त्याबदल्यात आरोपीने सुमारे ३ किलो ३०० ग्रॅम वजनाची नाणी दिली.

मात्र, नंतर सर्व नाण्यांची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. (Patur Police Case) आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून सहाय्यक फौजदार (ASI) चव्हाण यांनी अप. क्र. ३४२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात फॉरेन्सिक पथकाची भेट झालेली नाही.