Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

कवी अजीम नवाज राही

‘वळीवाच्या वेळा’ला दमसा.चा रत्नाकर काव्यपुरस्कार..

Poet Azim Nawaz Rahi: प्रख्यात मराठी कवी अजीम नवाज राही यांना कोल्हापूरमध्ये 'रत्नाकर उत्कृष्ट काव्यपुरस्कार' देण्यात येणार आहे.


‘वळीवाच्या वेळा’ला दमसाचा रत्नाकर काव्यपुरस्कार

Poet Azim Nawaz Rahi |

 

कवी अजीम नवाज राही यांचा कोल्हापूरात होणार सन्मान!

बुलढाणा (Poet Azim Nawaz Rahi) : प्रख्यात मराठी कवी, वक्ते व निवेदक अजीम नवाज राही (Poet Azim Nawaz Rahi) यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या कवितासंग्रहास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचा यंदाचा ‘रत्नाकर उत्कृष्ट काव्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारात १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे स्वरूप असून, २४ मे रोजी कोल्हापूर येथे आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अथर्व पब्लिकेशन, जळगाव प्रकाशित ‘वळीवाच्या वेळा’ हा कवितासंग्रह समकालीन समाजमनाचे संवेदनशील प्रतिबिंब मानला जातो. धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीची निखळ जाणीव जपणारी ही कविता वास्तवाशी थेट संवाद साधते. मातीचा सुगंध लाभलेली भाषाशैली, प्रतिमांची समृद्धता आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना स्पर्श करणारी आशयघनता हे राही यांच्या कवितेचे वैशिष्ट्य मानले जाते.

‘व्यवहाराचा काळा घोडा’, ‘कल्लोळातला एकांत’, ‘वर्तमानाचा वतनदार’, ‘तळमळीचा तळ’ यांसह अनेक गाजलेल्या कवितासंग्रहांचे ते लेखक असून, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, कवी केशवसुत पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार आदी प्रतिष्ठेचे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश आहे.

Related to this topic: