Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

योगपटू किशन भवर

आंतरराष्ट्रीय योगपटू किशन भवर यांना 'कला भूषण' पुरस्कार जाहीर

Kishan Bhawar: योगपटू किशन भवर यांना ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाच्या वतीने 'कला भूषण पुरस्कार' देण्यात आला. त्यांच्या योग कलेच्या प्रचारासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड झाली.


आंतरराष्ट्रीय योगपटू किशन भवर यांना कला भूषण पुरस्कार जाहीर

Kishan Bhawar |

नांदेड (Kishan Bhawar) : ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'कला भूषण पुरस्कार' यंदा आंतरराष्ट्रीय योगपटू किशन रंगराव भवर यांना जाहीर झाला आहे. योग या अतिप्राचीन भारतीय कलेचा देश-विदेशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

​येत्या महाराष्ट्र दिनी, लोहा येथे आयोजित 'अक्षरलेणं साहित्य संमेलनात' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला ख्यातनाम साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, कंधार-लोहा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि संयोजक डॉ. घ.ना. पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

किशन भवर (Kishan Bhawar) यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोकराव गरड, प्रलोभ कुलकर्णी, मीना कदम, स्नेहा कुलकर्णी,पत्रकार पवन जगडमवार, सुप्रिया जोगदंड, शिवाजीराव घोडके, संतोष सूर्यवंशी, मारोती शिंदे, अर्चना तोटावाड, ज्ञानोबा काळे, शांता लाडेकर, अशोकराव नातेवाड, आशा पावडे व डॉ. सायन्ना मठमवार यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related to this topic: