Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

खेट्री जि. प. शाळा

जि. प. शाळा घाणीच्या विळख्यात; आवार बनले तलाव

Khetri ZP school: खेट्री येथील जिल्हा परिषदची मराठी-उर्दू शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याने चिखळ आणि घाणीचे आवारा बनले. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न


जि प शाळा घाणीच्या विळख्यात आवार बनले तलाव

Khetri ZP school |

खेट्री येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पातूर (Khetri ZP school) : पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण आवाराचे तलावात रूपांतर झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा योग्य निचरा नसल्यामुळे शाळेच्या प्रवेशद्वारासह वर्गखोल्यांसमोर चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दररोज विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत असून लहान मुले घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ग्रामस्थांनी व पालकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच कायमस्वरूपी जलनिस्सारणाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड?

खेट्री येथे जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा (Khetri ZP school) एकाच परिसरात असून येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचून अस्वच्छता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, तातडीने जलनिस्सारण व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related to this topic: