Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

खानापुर फाट्यावर हानामारी

त्या वाहनचालका विरुध्द नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल

Nava Mondha police: खानापुर फाटा येथे झालेल्या वादात स्कॉर्पिओ वाहनाने तरुणाच्या अंगावरून जाण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाई.


त्या वाहनचालका विरुध्द नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल

Nava Mondha police |

खानापुर फाट्यावर हानामारील, गाडीने चिरडण्याचा प्रयत्न ; व्हिडीओ व्हायरल

परभणी (Nava Mondha police) : शहरातील खानापुर फाटा परिसरात शनिवार  २१ मार्च रोजी  सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेदरम्यान एका तरुणाच्या अंगावरून स्कॉर्पिओ गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच प्रकरणातील वाहनचालकाने निष्काळजीपणे रिव्हर्स घेताना एका इसमाला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवा मोंढा पोलीसात  वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास काही युवक स्कॉर्पिओ वाहनातून खानापुर फाटा येथे आले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि युवकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यावेळी एका तरुणाच्या अंगावरून स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने तो बचावला.दरम्यान, याच (Nava Mondha police) घटनेत स्कॉर्पिओ चालकाने निष्काळजीपणे रिव्हर्स घेताना शेख आसेफ शेख युसुफ  वय ३५  यांना धडक दिल्याने ते जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिसांनी त्याची पडताळणी करून कारवाई केली.याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक महादेव मांजरनकर यांच्या फिर्यादीवरून   एम एच २२ ९०५०या क्रमांकाच्या वाहनचालका विरुध्द  नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: