Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी पाणीटंचाई

लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात?

Kalamnuri Water Scarcity: अधिकृत पाणीपुरवठ्यापासून दूर असलेल्या गुत्तेदारीकडून नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे संदर्भात नगरपालिका आणि स्थानीय प्रशासनावर आरोप वाढत आहे.


लिकेजच्या नावाखाली हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या घशात

Kalamnuri Water Scarcity |

 

आठ-आठ दिवस पाणीटंचाई;
नगरपालिकेच्या मुख्य टाकीतील लिकेज हजारो लिटर पाणी टँकरने घेऊन जात आहे

कळमनुरी (Kalamnuri Water Scarcity) : कळमनुरी शहरातील नागरिकांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे नगरपालिकेच्या मुख्य पाणीटाकी परिसरातून "लिकेज पाणी" असल्याचे सांगून हजारो लिटर पाणी गुत्तेदाराकडून टँकरद्वारे नेले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुख्य पाणीटाकी काही अंतरावर असलेले ईसापुर कमानाजवळ मोठा खड्डा करून त्यामध्ये इंजिन बसविण्यात आले असून, तेथून दररोज चार ते पाच टँकर पाणी रस्त्यावरील कामांसह इतर बांधकामांसाठी नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना, दुसरीकडे हजारो लिटर पाणी गुत्तेदाराच्या वापरासाठी दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचारी आणि गुत्तेदार यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे. तसेच या (Kalamnuri Water Scarcity) प्रकाराकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून, "लिकेज"च्या नावाखाली नेमके किती पाणी वापरले जात आहे, ते कोणाच्या परवानगीने दिले जात आहे, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: