Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आ. संतोष बांगर

विशेष बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयास संस्थेतर्फे केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: हिंगोलीमध्ये प्रयास संस्थाने विशेष बालकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत, आ. संतोष बांगर यांनी त्यांचे काम कौतुक केले.


विशेष बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयास संस्थेतर्फे केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आ संतोष बांगर 

MLA Santosh Bangar |

हिंगोली (MLA Santosh Bangar) : विशेष बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयास संस्थेतर्फे केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत संस्थेच्या कामाचे कौतुक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केले आहे.विशेष म्हणजे यावेळी या विशेष बालकांनी केलेल्या त्यांच्या आगळ्या वेगळ्या सत्काराने ते भावुक झाले होते. 

हिंगोली शहरात प्रयास सेवाभावी संस्थेतर्फे विशेष बालकांसाठी मागील आठ वर्षांपासून एक केंद्र चालविले जात आहे. या केंद्राला प्रथमत आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी २८ मार्च शनिवारी भेट दिली. केवळ दहा मिनिटांच्या भेटीसाठी आलेले आमदार बांगर तब्बल एक तास प्रयास केंद्राच्या विशेष बालकांमध्ये रमले. यावेळी केंद्रावर उपस्थित असलेल्या बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाची माहिती आ. बांगर यांना दिली.

 कोणताही शासकीय निधी न घेता नाममात्र शुल्कावर विशेष बालकांना अनेक कौशल्य शिकविले जात असल्याचे वाहून आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी प्रयास केंद्राचे मनापासून कौतुक केले. भविष्यात प्रयास केंद्रासाठी कोणतीही मदत लागल्यास आपण त्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी ते  म्हणाले. 

 याप्रसंगी प्रयास सेवाभावी संस्थेचे सचिव गुंडेवार, सौ गुंडेवार, केंद्रप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासहित प्रविण गुंडेवार, प्रविण राऊत, भगवान गव्हाणकर, डॉ. सिध्दांत हनुमंते, 
प्रतिमा गुंडेवार, प्रतिभा राजुलवार तसेच विद्यार्थी सत्यम शर्मा, प्रत्वीश टापरे, अनन्या चौरे, स्पृहा वाहुळे, जिशांत प्यारेवाले, इजान शेख, रियान शेख, उत्कर्ष कांबळे, प्रनिकेत भट्ट, योगेश्वर गुंडेवार, कृष्णा साखरे, प्रभास पैठणे, यश दराडे उपस्थित होते.

Related to this topic: