Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

आ. भीमराव केराम

रस्ते पुलांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा हलगर्जीपणा कराल तर याद राखा: आ. भीमराव केराम

MLA Bhimrao Keram: अतिवृष्ठीप्रभावाने माहूर-किनवट या परिसरातील रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले. जनजीवन व सुरक्षितता याचे खूप असणारे परिणाम देणार आहेत


रस्ते पुलांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा हलगर्जीपणा कराल तर याद राखा आ भीमराव केराम

MLA Bhimrao Keram |

माहुर (MLA Bhimrao Keram) : किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचे प्रमुख रस्ते, पूलांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक गावांचा संपर्क धोक्यात आला आहे तर अर्धवट असलेले कामे तातडीने पूर्ण मार्गी लावा अन्यथा कारवाईस सामारे जा असा इशारा आ. भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.

मतदारसंघातील परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांना तातडीने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत तर नुकसानग्रस्त सर्व रस्ते, पूल व पुलियांची तात्काळ संयुक्त पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करावा, दुरुस्तीची कामे कोणताही विलंब न करता पूर्ण करावीत तसेच वाहतुकीस धोका निर्माण झालेल्या ठिकाणी तात्पुरते पर्यायी मार्ग, इशारा फलक व आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते व पूल लवकरात लवकर वाहतुकीस खुले करावेत, अन्यथा उद्भवणाऱ्या गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असे आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने प्रभावी कार्यवाही करून जनजीवन पूर्ववत सुरळीत करावे, असेही आमदार भीमराव केराम यांनी निर्देशित केले.